२०१६ मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वोत्तम ठरलेले हे १० सिनेमे

0
246
bollywood movie at all over india

२०१६ हे वर्ष बॉलिवूडसाठी खूपच आश्चर्यकारक ठरले असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण यावर्षी ज्या सिनेमांकडून अपेक्षा होत्या, त्या सिनेमांना प्रेक्षकांनी सपशेल नाकारले. तर ज्यांच्याकडून अजिबात अपेक्षा नव्हत्या अशा सिनेमांनी बॉक्स आॅफिसवर पैशांची लयलूट केली. अशाच काही बॉक्स आॅफिसवर सर्वोत्तम कमाई करणाºया सिनेमांचा घेतलेला हा आढावा…

सुल्तान

List of 2015 Bollywood Movies

२०१६ मधील सर्वाधिक कमाई करणाºया सिनेमांमध्ये सुपरस्टार सलमान खान याच्या ‘सुल्तान’ने बाजी मारली. या सिनेमाने ३००.४५ कोटी रुपयांची कमाई करून बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड केला. अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमामध्ये सलमानसोबत अनुष्का शर्मा लीट रोलमध्ये बघावयास मिळाली. 

sultan images hd at all over india

एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी

Top 10 Hindi Songs

कॅप्टन कुल म्हणून ओळखल्या जाणाºया भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी याच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमालादेखील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. या सिनेमाने जवळपास १३२.८५ कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने धोनीची भूमिका साकारली होती. त्याच्याबरोबर दिशा पटानी आणि किआरा आडवाणी या लीड रोलमध्ये बघावयास मिळाल्या. 

MS dhoni movie story at all over india

एयरलिफ्ट

अभिनेता अक्षयकुमार याच्यासाठी २०१६ हे वर्ष खूपच चांगले गेले. या वर्षात आलेल्या त्याच्या तिन्ही सिनेमांनी बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली. राजा कृष्ण मेनन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एयरलिफ्ट’ने १२९ कोटी रुपयांची कमाई केली. अक्षयसोबत निमृत कौर हिच्या अभिनयाचेही कौतुक केले गेले. 

airlift movie story at all over india

रुस्तम 

‘रुस्तम’ हा सिनेमा एका नेव्ही आॅफिसरच्या जीवनावर आधारित होता. यामध्ये अक्षयकुमार नेव्ही अधिकाºयाच्या भूमिकेत होता. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना जबरदस्त भावली होती. त्यामुळेच या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर १२७.४२ कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमात अक्षयकुमारबरोबर इलियाना डिक्रूज आणि इशा गुप्ता यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. 

rustam full movie story at all over india

ऐ दिल है मुश्कि

रिलीज अगोदरच पाकी कलाकारांमुळे वादाच्या भोवºयात सापडलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमानेही बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. तब्बल ११२.१४ कोटी रुपयांची कमाई करीत सिनेमाने पाचव्याच दिवशी शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या ऐश्वर्या राय आणि रणबीर कपूर यांच्यातील केमेस्ट्री चांगलीच चर्चेत आली होती. यांच्या व्यतिरिक्त अनुष्का शर्मा आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांचीही मुख्य भूमिका होती. 

ye dil hai muskil full movie story at all over india

हाउसफुल – ३

हाउसफुल सिरीजच्या इतर सिनेमांप्रमाणे ‘हाउसफुल-३’ या सिनेमानेही बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. तब्बल १०७.७० कोटी रुपयांची कमाई करीत या सिनेमाने लोकांना पोटधरून हसविले. सिनेमात अक्षयकुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, लीजा हेडन, नर्गिस फाखरी, बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

housefull 3 full movie story at all over india

शिवाय

अभिनेता अजय देवगण याच्या प्रॉडक्शन हाउसमध्ये बनलेल्या ‘शिवाय’नेही बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमाला टक्कर देताना ‘शिवाय’ने १००.५ कोटी रुपयांची कमाई केली. वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेल्या या सिनेमात विदेशी अभिनेत्री एरिका कार आणि सयेशा सैगल यांच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक केले गेले. 

shivaay movie story and review at all over india

फॅन

Read About Shahrukh Khan

२०१६ हे वर्ष बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसाठी फारसे चांगले गेले नाही. त्याला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या ‘फॅन’ या सिनेमाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नाही. या सिनेमाने ८५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. सिनेमात शाहरूख डबल रोलमध्ये बघावयास मिळाला. 

fan movie at all over india

बागी 

टायगर श्रॉफ याच्या ‘बागी’ या सिनेमानेही बॉक्स आॅफिसवर जेमतेम कमाई केली. तामिळ सिनेमाचा रिमेक असलेल्या ‘बागी’ने तब्बल ७६ कोटी रुपयांचा गल्ला जमविला. सिनेमात टायगरबरोबर श्रद्धा कपूर बघावयास मिळाली. शब्बीर खान यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले. 

baaghi movie poster at all over india

नीरजा

‘नीरजा’ या बायोपिकमध्ये सोनम कपूर हिने नीरजा भनोट हिची भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स आॅफिसवर सरासरी कमाई करताना ७५.६१ कोटी रुपयांचा आकडा गाठला. राम माधवानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात शबाना आजमी आणि गायक शेखर रावजियानी यांच्याही भूमिका आहेत. 

nirja movie story at all over india

Blog Writer: Rashmi Mahajan